Berojgari Bhatta Maharashtra 2023 : महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना 2023

0
51

रोजगार तरुणांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता सुरू केला आहे. या योजनेंतर्गत राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना महाराष्ट्र सरकारकडून दरमहा 5000/- रुपये बेरोजगार भत्ता दिला जाईल. सुशिक्षित बेरोजगार तरुणांना महाराष्ट्र सरकार, आर्थिक सहाय्य स्वरूपात 5000/- रुपये  प्रदान करणार आहे. बेरोजगारी भत्ता योजना महाराष्ट्र या योजनेच्या माध्यमातून  राज्यातील तरुणांना स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी चांगल्या प्रकारे घेता येणार आहे. या रकमेतून बेरोजगार तरुणांना दूरवरच्या नोकऱ्या शोधण्यासही मदत होणार आहे.

 Maharashtra Berojgari Bhatta 2023 Highlights

योजनेचे नावमहाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना 2023
व्दारा सुरुवातमहाराष्ट्र सरकार
राज्यमहाराष्ट्र
योजनेची सुरुवात2020
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील बेरोजगारांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
उद्देश्यराज्यातील बेरोजगार तरुणांना या योजनेच्या माध्यमातून बेरोजगारी भत्ता प्रदान करणे
वर्ष2023
अर्ज करण्याची पद्धतीऑनलाइन
विभागकौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालय, महाराष्ट्र शासन

बेरोजगारी भत्ता महाराष्ट्र 2023 वैशिष्ट्ये 

बेरोजगारी देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करते कारण संसाधने निर्माण करण्यासाठी फायदेशीरपणे कार्यरत असलेले कर्मचारी प्रत्यक्षात उर्वरित कार्यरत लोकसंख्येवर अवलंबून असतात, त्यामुळे राज्याच्या सामाजिक-आर्थिक खर्चात वाढ होते. उदाहरणार्थ, बेरोजगारीमध्ये 1% वाढ जीडीपी 2% ने कमी करते. दीर्घकाळ बेरोजगार असलेले लोक पैसे कमावण्‍यासाठी बेकायदेशीर आणि चुकीच्या कामात गुंतू शकतात ज्यामुळे देशात गुन्हेगारी वाढते, सरकारला अतिरिक्त कर्जाचा बोजा सहन करावा लागतो कारण बेरोजगारीमुळे उत्पादनात घट होते आणि लोकांकडून वस्तू आणि सेवांचा कमी वापर होतो. बेरोजगारीच्या समस्येमुळे गरिबीची समस्या निर्माण होते. बेरोजगार व्यक्तींना असामाजिक घटक सहजपणे दिशाहीन करू  शकतात. त्यामुळे त्यांचा देशातील लोकशाही मूल्यांवरचा विश्वास उडतो. 

अर्थव्यवस्थेतील बेरोजगारीची समस्या कमी करण्यासाठी सरकारने अनेक धोरणे सुरू केली आहेत. या बेरोजगार भत्ता योजनेंतर्गत महाराष्ट्रातील अर्जदारांनी किमान 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . राज्यातील इच्छुक लाभार्थी ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांना या योजनेअंतर्गत अर्ज करावा लागेल. या महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना अंतर्गत, प्रति महिना 5000/- रुपये रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात सरकारद्वारे हस्तांतरित केली जाईल. त्यामुळे अर्जदाराचे बँक खाते असणे बंधनकारक असून बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे. 

तुम्ही जर महाराष्ट्राचे कायमचे रहिवासी असाल तर तुम्ही बेरोजगारी भत्त्यासाठी अर्ज करू शकता. जर तुम्हाला या योजनेत अर्ज करायचा असेल, तर किमान 12वी उत्तीर्ण आणि बेरोजगार असलेल्या अर्जदाराला या योजनेद्वारे दरमहा 5000 रुपये दिले जातील. ज्याचा उपयोग ते त्यांचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी किंवा त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कुठेही खर्च करू शकतात. तुम्ही ही रक्कम तुमच्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी देखील वापरू शकता. या ऑनलाइन नोंदणी पोर्टवर आतापर्यंत अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी नोंदणी केली आहे. ज्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, बेरोजगारांना मासिक भत्ता देण्यात शासन यशस्वी होत आहेत. या योजनेचा लाभ १८ वर्षांवरील तरुणांना दिला जाणार आहे.

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता 2023 उद्देश्य 

भारतातील बेरोजगारीची प्रमुख कारणे आहेत, ती आपण थोडक्यात माहित करून घेऊ, व्यावसायिक कौशल्यांचा अभाव किंवा कार्यरत लोकसंख्येची कमी शैक्षणिक पातळी. विशेषत: नोटाबंदीनंतर खाजगी गुंतवणुकीतील मंदीमुळे कामगार-केंद्रित क्षेत्रे त्रस्त आहेत, कृषी क्षेत्रातील कमी उत्पादकता तसेच कृषी कामगारांसाठी पर्यायी संधींचा अभाव यामुळे तीन क्षेत्रांमधील संक्रमण कठीण होते. आवश्यक शिक्षण किंवा कौशल्ये नसल्यामुळे देशातील प्रचंड कर्मचारी वर्ग अनौपचारिक क्षेत्राशी निगडीत आहे आणि हा डेटा रोजगाराच्या आकडेवारीत पकडला जात नाही. स्ट्रक्चरल बेरोजगारीचे मुख्य कारण म्हणजे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये दिले जाणारे शिक्षण उद्योगांच्या सध्याच्या गरजेनुसार नाही. हि सर्व कारणे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे समाजावर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करतात.

केंद्र सरकार प्रमाणेच देशातील सर्व राज्यांचे सरकार या समस्येवर मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे, यासाठी अनेक धोरणे आखल्या जात आहे, अनेक योजना त्यासाठी तयार केल्या जात आहे जेणेकरून ग्रामीण भागांबरोबर शहरी भागातील बेरोजगारी कमी होईल. महाराष्ट्र शासन, राज्यातील तरुणांना जो पर्यंत त्यांना रोजगार उपलब्ध होत नाही तोपर्यंत बेरोजगारी भत्ता देणार आहे, या बेरोजगारी भत्ता योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार राज्यातील तरुणांना त्यांचे जीवनमान सुधारण्याची आणि सुरळीत करण्याची संधी देत आहे, हा बेरोजगारी भत्ता देण्याचा शासनाचा उद्देश्य आहे कि राज्यातील तरुणांना या योजनेच्या सहायाने आर्थिक मदत करणे, हि योजना तरुणांचे जीवन थोडेफार बदलणार आहे. हा पैसा तरुणांना त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी वापरता येईल. 

बेरोजगारी भत्ता योजना महाराष्ट्र 2023 लाभ आणि वैशिष्ट्ये 

राज्यातील सर्व बेरोजगार तरुणांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हि योजना संपूर्ण राज्यात सुरु केली आहे

  • हि योजना महाराष्ट्र शासनाने सुरु केली आहे, हि योजना राज्यातील तरुणांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनण्यास मदत करेल 
  • या योजनेमुळे राज्यातील तरुणांना त्यांच्या स्वतःच्या सर्व गरजा पूर्ण करता येईल बरोबर त्यांना त्यांच्या घरच्यांना मदत करता येईल 
  • महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना 2022 या योजनेचा लाभ मिळवायसाठी राज्यातील तरुणांना राज्यातील कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही, या योजनेत अर्ज करण्याची पद्धत शासनाकडून अत्यंत सुलभ करण्यात आली आहे, तरुण या योजनेसाठी अर्ज शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन करू शकतात.
  • या योजनेंतर्गत राज्यातील बेरोजगार तरुणांना महाराष्ट्र शासनाकडून दरमहा 5000/- रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.
  • बेरोजगार भत्ता योजनेंतर्गत राज्यातील बेरोजगार तरुणांना नोकरी मिळेपर्यंत बेरोजगारी भत्ता दिला जाईल
  • बेकारी भत्ता ठराविक कालावधीसाठी देय असेल.
  • या योजनेंतर्गत लाभ मिळविण्यासाठी अर्जदार किमान 12वी उत्तीर्ण असावा. महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेमुळे महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांना याचा आर्थिक फायदा होणार आहे. महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता या योजनेंतर्गत मिळणारा बेरोजगारी भत्त्याची रक्कम थेट लाभार्थी तरुणांच्या बँक खात्यात जमा होणार आहे , या मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे हे तरुण स्वतःसाठी नोकरी शोधू शकतात, तसेच स्वतःचा दैनंदिन खर्च ते भागवू शकतात. 

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेच्या अंतर्गत पात्रता 

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता या योजनेच्या अंतर्गत लाभ मिळविण्यासाठी खालीलप्रमाणे पात्रता असणे आवश्यक आहे 

  • महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेअंतर्गत, अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे 
  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा
  • या योजनेच्या अंतर्गत अर्जदाराकडे उत्पन्नाचा कोणताही स्रोत नसावा.
  • अर्जदाराचे वय 21 ते 35 वर्षे दरम्यान असावे
  • शिक्षणात पदवी आणि कोणत्याही व्यावसायिक किंवा नोकरीभिमुख अभ्यासक्रमात पदवी नसलेला असावा 
  • या योजनेच्या अंतर्गत उमेदवार हा शासनाच्या रोजगार कार्यालयात नोंदणी कृत असणे आवश्यक आहे 
  • या योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदारा हा पूर्णपणे बेरोजगार असावा, तो कोणत्याही सरकारी किंवा खासगी कार्यालयात कार्यरत नसावा.

बेरोजगारी भत्ता योजना 2023 महाराष्ट्र आवश्यक कागदपत्र

या योजनेच्या अंतर्गत लाभ मिळविण्यासाठी अर्जदाराला पुढील प्रमाणे कागदपत्र आवश्यक आहे 

ओळखपत्र

  • पत्त्याचा पुरावा
  • वय प्रमाणपत्र
  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र (मार्कशीट)
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • आय प्रमाणपत्र 

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना 2023 अंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत 

राज्यातील ज्या इच्छुक उमेदवारांना या योजनेच्या अंतर्गत सरकारकडून बेरोजगारी भत्ता मिळवायचा आहे, त्यांनी खाली दिलेल्या पायऱ्यांचे अनुसरण करा करा.

  • या योजनेच्या अंतर्गत अर्जदाराल सर्व प्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल 
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना 2022
  • यानंतर तुमच्यासमोर या वेबसाईट मुख्यपृष्ठ उघडेल, 
  • या होमपेजवर तुम्हाला नोकरी इच्छुक लॉगिन हा पर्याय दिसेल 
  • या पर्यायाच्या तळाशी तुम्हाला रजिस्टर हा पर्याय दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल 
  • या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक नोंदणी फॉर्म उघडेल, या नोंदणी फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती जसेकी आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक, इत्यादी संपूर्ण माहिती भरावी लागेल.
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना 2022
  • अशा प्रकारे संपूर्ण माहिती भरल्यावर, तुम्हाला खालील नेक्स्ट या बटनावर क्लिक करावे लागेल 
  • त्यानंतर तुमच्या मोबाइलवर एक OTP येईल, यानंतर तुम्हाला हा OTP भरून सबमिट या बटनावर क्लिक करावे लागेल 
  • आता तुम्हाला लॉगिन करण्यासाठी परत मागील पेजवर जावे लागेल, आता तुम्हाला लॉगिन फॉर्ममध्ये युजरनेम आणि पासवर्ड त्याचबरोबर कॅप्चा कोड भरावा लागेल, आणि त्यानंतर लॉगिन या बटनावर क्लिक करावे लागेल 
  • या प्रकारे तुमची अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल 

Grievances नोंदणी करण्याची पद्धत 

या योजनेच्या अंतर्गत अर्जदाराल सर्व प्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल 

यानंतर तुमच्यासमोर या वेबसाईट मुख्यपृष्ठ उघडेल, 

  • या होमपेजवर तुम्हाला पेजच्या तळाशी Grievances हा पर्याय दिसेल 
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना 2022
  • तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल. ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढचे पेज तुमच्यासमोर ओपन होईल. या पृष्ठावर, तुम्हाला तक्रार नोंदणी फॉर्म दिसेल.
  • तुम्हाला या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल जसे की वैयक्तिक तपशील, पत्ता आणि संपर्क तपशील, तक्रारी इ. सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.
  • अशा प्रकारे तुमची तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
योजनेची अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
हेल्पलाईन नंबर022-22625651/53
महाराष्ट्र सरकारी योजनाइथे क्लिक करा