Home क्रीडा IND vs ENG : भारतीय संघाला झटका, स्टार खेळाडू परतणार, बीसीसीआयकडून परतीचे आदेश | Ind vs Eng Test Series BCCI Tells Opener Shubman Gill to Return India Due to his Injury

IND vs ENG : भारतीय संघाला झटका, स्टार खेळाडू परतणार, बीसीसीआयकडून परतीचे आदेश | Ind vs Eng Test Series BCCI Tells Opener Shubman Gill to Return India Due to his Injury

0

[ad_1]


भारताचा कसोटी संघात फलंदाजीत महत्त्वाच्या भूमिका निभावणारा हा खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे 4 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.

IND vs ENG : भारतीय संघाला झटका, स्टार खेळाडू परतणार, बीसीसीआयकडून परतीचे आदेश

शुभमन गिल

मुंबई : भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पराभवानंतर आता इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. मात्र या मालिकेआधीच भारतीय संघाला एका झटका बसला आहे. भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) दुखापतग्रस्त झाल्याची माहिती 30 जूनला समोर आली होती. त्याला दुखापतीतून सावरण्यास वेळ लागला असणार असल्याने आता त्याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मायदेशी परतण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर येत आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेला बराच काळ आहे. 4 ऑगस्टपासून सामने सुरु होणार असल्याने तोवर सर्व संघ मित्र आणि परिवारासह वेळ घालवण्यात व्यस्त आहे. आता काही दिवसांतच सर्व संघ सामन्याच्या सरावासाठी एकत्र जमणार असून यामध्ये गिल सामिल होणार नाही. क्रिकेट वेबसाइट क्रिकबजने दिलेल्या माहितीनुसार भारतीय क्रिकेट बोर्डाने 22 वर्षीय युवा फलंदाज शुभमन गिलला मायदेशी परतण्याचे आदेश दिले आहेत. शुभमनच्या पायाला (गुडघा आणि तळवा यांच्यामधील भाग) दुखापत झाली आहे. महत्त्वाच्या भागाला दुखापत झाल्याने पुढील काही काळ शुभमनला विश्रांती घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे

गिलसाठी पर्याय उपलब्ध

भारतीय क्रिकेट संघाला इंग्लंडविरोधात कसोटी मालिका खेळायची असून यावेळी शुभमन जागी सलामीसाठी सर्वात पहिला पर्याय म्हणजे मयांक अगरवाल (Mayank Agarwal) याचा आहे. कारण याआधी इंग्लंड दौऱ्यावर मयांक इंग्लंड विरोधात सलामीला उतरला असून त्याने इंग्लंडच्या मैदानावर चांगली खेळी केली होती. त्यानंतर गिलच्या जागेसाठी दुसरा प्रबळ दावेदार आहे भारताचा स्टार क्रिकेटर के एल राहुल (KL Rahul). राहुलने याआधी मुरली विजयसह मिळून भारतासाठी काही कसोटी सामन्यांत अप्रतिम कामगिरी केली आहे. लोकेश आणि मयांक यांच्याशिवाय आणखी एक फलंदाज सलामीसाठी उतरु शकतो. तो म्हणजे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारा हनुमा विहारी (Hanuma Vihari). दरम्यान या सर्व अनुभवी खेळाडूंसह भारतीय संघाकडे आणखी एक खेळाडू सलामीवीर म्हणून भूमिका पार पाडू शकतो. तो म्हणजे भारतीय संघासोबत स्टँड बाय खेळाडू म्हणून गेलेला अभिमन्यू ईश्वरन (Abhimanyu Easwaran). 25 वर्षीय अभिमन्यूने64 प्रथम श्रेणी सामन्यांत 4 हजार 402 धावा केल्या आहेत. 43.57 च्या सरासरीने केलेल्या या धावांमध्ये 13 शतकांसह 18 अर्धशतकांचा समावेश आहे.

हे ही वाचा –

शुभमनच्या दुखापतीबद्दल महत्त्वाची माहिती समोर, वाचा किती काळ गिलला संघाबाहेर रहावे लागणार

IND vs ENG Test Series : शुभमन गिलला दुखापत, रोहित सोबत सलामीसाठी कोण उतरणार?, ‘हे’ आहेत प्रमुख दावेदार

दिग्गज अष्टपैलू क्रिकेटर कपिल देव ‘या’ गोष्टीवरुन भारतीय गोलंदाजांवर नाराज, म्हणतात ‘अशी परिस्थिती पाहून वाईट वाटतं’

(Ind vs Eng Test Series BCCI Tells Opener Shubman Gill to Return India Due to his Injury)

[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here