Monday, October 2, 2023
Homeक्रीडाVideo | राज कपूर यांच्या टीमशी मुकाबला, दिलीप कुमारांनी क्रिकेटच्या मैदानातही दाखवला...

Video | राज कपूर यांच्या टीमशी मुकाबला, दिलीप कुमारांनी क्रिकेटच्या मैदानातही दाखवला जलवा! | Charity Cricket Match between Dilip Kumar and Raj Kapoor see throwback videoचित्रपटसृष्टीत त्यांच्या अविस्मरणीय अभिनयाने एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या या दोन दिग्गजांची क्रिकेटच्या मैदानावरही टक्कर झाली होती आणि ही टक्करसुद्धा खूप मजेशीर होती, जी या दोन्ही दिग्गजांच्या चाहत्यांसाठी आणि बॉलिवूडमधील अनेक बड्या स्टार्सची खास आठवण ठरली होती.

Video | राज कपूर यांच्या टीमशी मुकाबला, दिलीप कुमारांनी क्रिकेटच्या मैदानातही दाखवला जलवा!

दिलीप कुमार

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील महान अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांचे आज (7 जुलै) निधन झाले. 98 वर्षांचे दिलीप कुमार बराच काळापासून आजारी होते. त्यांनी बुधवारी सकाळी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. दिलीप कुमार यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील सुवर्ण पिढीचा शेवटचा दुवाही तुटला. दिलीप कुमार यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत एकापेक्षा एक सुपरहिट आणि संस्मरणीय चित्रपट केले आहेत (Charity Cricket Match between Dilip Kumar and Raj Kapoor see throwback video).

प्रत्येकाने त्याचा स्वभाव रुपेरी पडद्यावर पाहिला. पण कॅमेर्‍यासमोर आपली कामगिरी दाखवणाऱ्या या दिग्गज व्यक्तीने क्रिकेटच्या मैदानातही आपली चमकदार कामगिरी दाखवली होती.

हे ऐकून आश्चर्य वाटेल, परंतु खरंच असे घडले होते. केवळ दिलीप कुमारच नाही, तर त्यांच्या काळातील सुपरस्टार राज कपूरही त्या सामन्याचा एक भाग होते. ही टक्कर राज कपूर आणि दिलीप कुमार यांच्यात झाली होती. चित्रपटसृष्टीत त्यांच्या अविस्मरणीय अभिनयाने एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या या दोन दिग्गजांची क्रिकेटच्या मैदानावरही टक्कर झाली होती आणि ही टक्करसुद्धा खूप मजेशीर होती, जी या दोन्ही दिग्गजांच्या चाहत्यांसाठी आणि बॉलिवूडमधील अनेक बड्या स्टार्सची खास आठवण ठरली होती.

चित्रपटसृष्टीतील दिग्गजांमध्ये सामना

हा सामना 1962 मध्ये खेळवला गेला होता. सिने वर्कर्स रिलीफ फंडासाठी पैसे गोळा करण्यासाठी हा चॅरिटी सामना खेळवला गेला होता आणि या दोन बॉलिवूड कलाकारांना दोन टीमचे कर्णधार बनवण्यात आले होते. यू ट्यूबर नईम खानने या सामन्याचा व्हिडीओ त्याच्या अकाउंटवर पोस्ट केला असून, या ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट व्हिडीओमध्ये दोन्ही स्टार्स व्यतिरिक्त वहीदा रहमान, जॉनी वॉकर, प्राण, शशी कपूर, शम्मी कपूर या नामांकित कलाकारांनीही भाग घेतला. त्याचवेळी, राज मेहरा या सामन्यावर कमेंट करत होते.

पाहा व्हिडीओ :

दिलीप कुमार यांची कारकीर्द

दिलीप कुमार यांच्या फिल्मी कारकिर्दीची सुरूवात 1944च्या ‘जवार भाटा’ या चित्रपटापासून झाली. तथापि, या चित्रपटाने त्यांना फारशी ओळख मिळवून दिली नाही. दिलीपकुमार यांना ‘जुगनू’ या चित्रपटापासून त्यांची खरी ओळख मिळाली. या चित्रपटानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर त्यांनी राज कपूरसोबत ‘अंदाज’ या चित्रपटात काम केले. हा चित्रपट सुपरहिट ठरला.

दिलीप कुमार यांनी ‘दीदार’, ‘देवदास’ आणि ‘मुगल-ए-आजम’ सारख्या चित्रपटांमध्ये दमदार अभिनय करून आपली ओळख निर्माण केली. दिलीप कुमार यांनी प्रत्येक शैलीतील चित्रपटात काम केले. दिलीप कुमार अखेर ‘किला’ या चित्रपटात दिसले होते. दिलीप कुमारसमवेत या चित्रपटात अमिताभ बच्चन देखील होते. या चित्रपटाची निर्मिती रमेश सिप्पी यांनी केली होती.

(Charity Cricket Match between Dilip Kumar and Raj Kapoor see throwback video)

हेही वाचा :

Dilip Kumar Throwback Photos : अमिताभ ते शाहरुख खान, बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांसोबत दिलीप कुमारांचे जवळचे संबंध, पाहा फोटो

Dilip Kumar | नाशिकशी दिलीप कुमारांचं खास कनेक्शन, याच ठिकाणी त्यांच्या आई-वडिलांची कबर!Source link

Shasannama News
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News