एक चूक आणि थेट ५० हजार रुपये अकाऊंटवरून झाले गायब; नेमकं काय घडलं? – amravati a call came for a refund and rs 50 thousand was stolen

0
59

[ad_1]

हायलाइट्स:

  • डिजिटल व्यवहार करताना आर्थिक फसवणूक
  • ५० हजार रुपयांची ऑनलाइन फसवूणक
  • अमरावती जिल्ह्यातील घटना

अमरावती : करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या (Coronavirus Lockdown) काळात जवळपास प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात मोठा बदल झाला. त्यातला महत्वाचा बदल म्हणजे सर्वसामान्य नागरिकांचंही जगणं डिजिटल झालं. याच डिजिटल व्यवहाराचा गैरफायदा सुद्धा घेतला जाण्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणात वाढू लागल्या आहेत. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर इथंही अशी एक घटना समोर आली आहे.

दर्यापूर येथील एका तरुणाने विमान प्रवासाचे तिकीट रद्द केले. तिकीटाचे पैसे रिफंड मिळण्यासाठी त्यांने कंपनीसोबतच संपर्क केला. कंपनीकडून सकारात्मक प्रतिसादही मिळाला. मात्र मध्येच त्याला कंपनीकडून बोलत असल्याचा अज्ञान कॉल आला. त्यांनी रिफंड मिळविण्यासाठी एका अॅपचा उपयोग करण्याचा आग्रह केला व युवकाच्या एका चुकीने सायबर चोरट्याने त्याला चक्क ५० हजार रुपयांचा चुना लावल्याची घटना समोर आली आहे.

विमानाच्या तिकीटाची बुकिंग रद्द झाली असून त्याची रक्कम जमा झाल्याचे सांगून एका अनोळखी व्यक्तीने ५० हजार रुपयांची ऑनलाइन फसवूणक केल्याची घटना पोलिस ठाण्यांतर्गत घडली.

शिवसेना आमदाराने कंत्राटदाराला चिखलात बसवले; कचऱ्याने घातली आंघोळ!

या प्रकरणी विजय सुरेश बांबल (२६) रा. विठ्ठल मंदिराजवळ, बाभळी, दर्यापूर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात फोनकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपासासाठी हे प्रकरण सायबर सेलकडे पाठवल्याची माहिती दर्यापूर पोलिसांनी दिली.

फिर्यादी बांबल यांनी नागपूर ते दिल्ली ते लेह असे विमानाचे तिकीट ९ हजार ८९ रुपयांत बुक केले होते, परंतु ती विमान सेवा रद्द झाल्याने त्यांनी तिकीटाचे पैसे परत मिळावे म्हणून रिफंडची रिक्वेस्ट संबंधित यंत्रणेकडे केली होती. परंतु त्यांना पैसे परत मिळाले नाहीत. दरम्यान १० जून रोजी सकाळी अकराच्या सुमारास त्यांना अज्ञात मोबाइल क्रमांकावरून फोन आला. त्याने एक अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. फोनकर्त्याने सांगितल्याप्रमाणे फिर्यादीने एटीएमचा पिन नंबर वापरून ट्रान्झेक्शन केले. मात्र त्यानंतर अज्ञात फोनकर्त्याने त्याच्या खात्यातून ४९,९९९ रुपये काढून घेत फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसात तक्रार केली.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करण्यात येत आहे.

[ad_2]

Source link