Home महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र PCMC : नमो ग्रुप फाऊंडेशनने मानले पिंपरी चिंचवड आयुक्तांचे आभार आणि आरोग्य कर्मचारींसाठी केली पदोन्नतीची मागणी

PCMC : नमो ग्रुप फाऊंडेशनने मानले पिंपरी चिंचवड आयुक्तांचे आभार आणि आरोग्य कर्मचारींसाठी केली पदोन्नतीची मागणी

0
PCMC : नमो ग्रुप फाऊंडेशनने मानले पिंपरी चिंचवड आयुक्तांचे आभार आणि आरोग्य कर्मचारींसाठी केली पदोन्नतीची मागणी

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन

भारतीय जनता पार्टी आणि नमो ग्रुप फाउंडेशन महाराष्ट्र मार्फत आज आमदार महेश दादा लांडगे, भाजपा पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष शंकर भाऊ जगताप तसेच आमदार अश्विनीताई जगताप व आमदार उमाताई खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त यांनी स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये केलेल्या विशेष कामगिरी बाबत नमो ग्रुप फाउंडेशन यांनी आभार मानले.

तसेच स्वच्छ भारत अभियानात आणि या स्वच्छ सर्वेक्षण मध्ये अहोरात्र मेहनत घेणारे कर्मचारी व अधिकारी यांच्या आरोग्य विभागातील सर्व संवर्गातील पदांची उदाहरणार्थ सहाय्यक आरोग्य अधिकारी, मुख्य आरोग्य निरीक्षक ,आरोग्य निरीक्षक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य मुकादम अशा विविध सर्व संवर्गातील पदांची 100% रिक्त पदे तातडीने विभागीय पदोन्नती समिती गठीत करून सर्व पदांचे पदोन्नती करणे कामी आज निवेदन देण्यात आले.

प्रशासन विभागाचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी देखील सर्व पदांकरिता उद्या विभागीय पदोन्नती समिती गठित करणार असल्याचे सांगितले. नमो ग्रुप फाउंडेशनचे प्रदेश अध्यक्ष व भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश महामंत्री मा. प्रमोदजी परदेशी यांच्या समवेत शिष्टमंडळाने भेट घेतली. संपूर्ण मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन माननीय उपायुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन विभाग यांनी दिलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here