Babamaharaj Satarkar Passed Away: प्रसिध्द कीर्तनकार बाबामहाराज सातारकर याचं निधन; वयाच्या ८९व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

0
41

शासननामा न्यूज ऑनलाईन

प्रसिध्द कीर्तनकार बाबामहाराज सातारकर याचं निधन झालं आहे. वयाच्या ८९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ज्येष्ठ कीर्तनकार म्हणुन जगभरात त्यांचं नाव आहे. महाराष्ट्राच्या गावागावात त्याचं किर्तन ऐकलं जात होतं, महाराष्ट्राच्या खेडोपाड्यापर्यंत त्यांचं नाव घेतलं जात.

आज त्यांचं वयाच्या ८९व्या वर्षी निधन झालं आहे.

नेरूळ येथील त्यांच्या गावी त्यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याची माहिती आहे. बाबामहाराज यांच्या निधनाने वारकरी सांप्रदायावर शोककळा पसरली आहे.

बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या (शुक्रवारी) 27 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, बाबा माहाराज सातारकर यांचं पार्थिव आज दुपारी 3 नंतर अंतिम दर्शनासाठी नेरूळ जिमखान्यासमोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ठेवण्यात येणार आहे.