RSS Dighi | दिघीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे  पथसंचलन संपन्न

0
98

दिघी, दि.२४ ऑक्टोबर (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन

राष्ट्रहित व सेवा कार्यासाठी सदैव कटिबद्ध असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दरवर्षी श्री विजयादशमी निमित्याने शहरात पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले.  यावर्षी श्री विजयादशमी निमित्त मंगळवार दि.२४ ऑक्टोबर विजयादशमी रोजी दिघीत आयोजित करण्यात आले होते. संचलनासाठी दिघी गावांतील शेकडो स्वयंसेवक उपस्थित होत्या.

दिघीतील येथील गेलेक्षी स्कुल, स्वराज कॉलोनी, श्री गजानन महाराज नगर, भोसरी आळंदी रोड येथून सायंकाळी ५.३० वाजता सघोष संचलनाला सुरुवात झाली. संचलनासाठी शेकडो स्वयंसेवक उपस्थित होते व संपूर्ण गणवेशात स्वयंसेवकांनी संचलन केले. तालबद्ध घोषासह निघालेले पथसंचलन, घोषगण तसेच अश्वरूढ ध्वज या सर्वांनीच आसपासच्या परिसरातील सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी परिसरातील स्थानिक नागरिकांतर्फे देखील संचलनाचे पुष्प टाकून मोठ्या उस्फूर्त भव्य स्वागत करण्यात आले.

पथ संचलनाची सुरुवात भगवा ध्वजास नमन व रा. स्व. संघाच्या प्रार्थनेने झाली.  यावेळी प्रमुख पाहुणे  म्हणून दिघीतील जेष्ठ समाजसेवक दत्तात्रय आबा पांडुरंग परांडे, रा. स्व. संघाचे विभाग व नगराचे कार्यकर्ते, परिसरातील उपमहापौर, नगरसेवक, नगरसेविका देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. परिसरातील स्थानिक गणेश मंडळे, नवरात्र उत्सव मंडळ व लोकप्रतिनिधी यांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केले होते. समितीकडून यावेळी त्यांचे आभार देखील व्यक्त करण्यात आले.