कोयता गँगचा मोरक्याच्या बीड येथुन आवळल्या मुसक्या; भारती विद्यापीठ पोलीसांची कामगिरी

0
43

पुणे (संपादक: सोमनाथ देवकाते) | शासननामा न्यूज ऑनलाईन

दिनांक २८/१२/२०२२ रोजी रात्री २२.०५ वा चे सुमारास सिंहगढ़ कॅम्पस मध्ये फिर्यादी जय सुनिल लाडके, जय २० वर्षे, रा. सिंहगड केली. आंबेगाव बु. पुणे यांचे मित्रगणा मारत बसले असताना आरोपी करण अर्जुन दळवी व त्याचा साथीदार सुजित गायकवाड यांनी दहशत पसरविण्याच्या इरादयाने हातात लोखंडी कोयता घेवून, हातातील कोयता हवेत फिरवुन येणारे जाणारे लोकांना धाक दाखवून दुकानाचे शटरवर वार करून रोडच्या कडेला असलेल्या गाड्यांवर कोयता मारुन दहशत निर्माण केल्याने तेथील लोकांनी दुकाने बंद करून सैरावैरा पळून गेली. ज्यावेळी तेथील स्टुल फिर्यादी यांचा मित्र तन्मय ठोंबरे यांचे पाठीवर फेकुन मारुला, तसंच फियांदा याचे मानेवर जिवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार करून जखमी केले आहे म्हणुन फिर्यादी यांनी तक्रार दिल्याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ८७७ २०२२ भादंवि कलम ३०७,३२३, ५०४, ४२०,३४, महाराष्ट्र पोलीस अधिनियक कलम ३७(१)( ३ ) सह १३५, भारतीय हत्यार कायदा कलम ४.२५ क्रिमीनल अमेन्टमेंट अॅक्ट कलम ७ अन्वये गुन्हा दाखल आहे.

दाखल गुन्हयातील आरोपी करण अर्जुन दळवी याचा भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अमलदार हे शोध घेत असताना पोलीस अंमलदार हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे यांना आरोपी करण अर्जुन दळवी हा बीड येथे लपुन बसला आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीर यांनी लागलीच तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार हर्षल शिंदे धनाजी धोत्रे, सचिन गाडे यांनी आरोपीचा शोध घेणेकामी रवाना केले होते. त्यानुसार त्यांनी बीड येथे जावून आरोपी करण अर्जुन दळवी वय २१ वर्षे, रा. माणिकबाग, सिंहगड रोड, पुणे याचा शोध घेतला असता तो साठ चौक, बीड येथे मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन अटक केली

सदरची कारवाई मा. श्रीमता स्मार्तना पाटील सो मा. पोलास उप आयुक्त पारमडळ २, मा. श्रीमती सुषमा चव्हाण सो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीहरी बहीरट, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, शैलेश साठे, सचिन सरपाले, चेलन गोरे, मंगेश पवार, निलेश ढमढेरे, अभिजीत जाधव, अवधुत जमदाडे, निलेश खैरमोडे, अशिष गायकवाड, अभिनय चौधरी, मितेश चौरमोले, राहुल तांबे यांच्या पथकाने केली. आहे.