Home महाराष्ट्र Dhangar reservation : चौंडीयेथील धनगर समाज मेळाव्यास मनोज जरांगे पाटील उपस्थित राहणार

Dhangar reservation : चौंडीयेथील धनगर समाज मेळाव्यास मनोज जरांगे पाटील उपस्थित राहणार

0
Dhangar reservation : चौंडीयेथील धनगर समाज मेळाव्यास मनोज जरांगे पाटील उपस्थित राहणार

अहमदनगर, 23 ऑक्टोबर (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन

दस-याचे औचित्य साधून चौंडी येथे धनगर समाजाकडून इशारा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी मराठा आरक्षणाचे मनोज जरांगे पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती यशवंत सेनेचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे पाटील यांनी दिली.

यावेळी बाळासाहेब दोलतडे, दादासाहेब केसकर,राजेंद्र बुध्याळ, शांतीलाल कोपनर,सुरेश बंडकर आण्णासाहेब रुपनवर, गोविंद नरवठे, नितीन धायगुडे, समाधान पाटील, किरण धालपे उपस्थित होते.चौंडी येथील मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत असतील, माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, दत्तात्रय भरणे, राम शिंदे मेळाव्याचे उदघाटक असतील.

धनगर समाजाचे चौंडी येथील 21 दिवसाचे उपोषण थांबविताना राज्य सरकारने 50 दिवसांत अनुसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणी करण्याचे लेखी पत्र यशवंत सेनेला दिले आहे. असे असूनही 30 दिवस उलटल्यानंतरही शासन पातळीवर कोणतीच हालचाल होताना दिसत नाही.

यामुळे झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी विजयादशमीचे औचित्य साधून सरकारला इशारा देण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here