Home पुणे महाराजामहाराजा यशवंतराव होळकर यांच्या स्मृतीदिनाचे आयोजन ; कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे शैलेश धारे यांचे अवाहन

महाराजामहाराजा यशवंतराव होळकर यांच्या स्मृतीदिनाचे आयोजन ; कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे शैलेश धारे यांचे अवाहन

0
महाराजामहाराजा यशवंतराव होळकर यांच्या स्मृतीदिनाचे आयोजन ; कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे शैलेश धारे यांचे अवाहन

पुणे, 23 ऑक्टोबर (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन

आद्यस्वातंत्र्य वीर महाराजा यशवंतराव होळकर यांच्या २१२ व्या पुण्यतिथी निमित्त श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी भानपुरा येथे स्मृतीदिन सोहळ्याचे आयोजन केले आहे. मध्यप्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील भानपुरा येथे प्रतीवर्षा प्रमाणे या ही वर्षी शनिवार दि.२८ ऑक्टोबर रोजी गडपुजन, ध्वजपुजन, नगर पालखी, भेट चढावा, चित्र प्रकाशन आणि दिपोत्सव आदी प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन असून या वेळी या महान योद्याच्या बलिदान दिवसानिमित्त “वीरश्रेष्ठ महाराजा यशवंतराव होळकर” या एकपात्री प्रयोगाचे प्रयोजन केले आहे. हा नाट्य प्रयोग इंदोरचे सुनील गणेश मतकर आणि त्यांचा समूह सादर करणार आहेत. तसेच या वेळी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक आणि दिल्ली येथुन जनसमुदाय उपस्थित राहणार आहे.

संध्याकाळी समाधी स्थळी दिपोत्सव साजरा करून सामूहिक राष्ट्रगान म्हणत या कार्यक्रमाची सांगता करण्यात येते. या महान राष्ट्रप्रेमी राजाच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी आपणा सर्वांना भानपुरा येथे येण्याचे आवाहन होळकर राजमंडळा कडून करण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी होळकर राजमंडळ, क्षत्रिय धनगर समाज उदयपुर (राज.), चंबळ रॉक्स टीम, भानपुरा मेरी जान, अहिल्यादेवी शोध संस्थान अंबड, महाराजा यशवंतराव होळकर जनसेवा संघ-पुणे आदी सामाजिक संस्था प्रयत्न करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here