मुंबई (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन
‘माझी खुर्ची खेचाल, खुर्ची हे माझं स्वप्न नव्हतं, पण काळ कठीण आहे. पुत्रकर्तव्य म्हणून मी खुर्चीवर आहे. बाळासाहेबांना हातात हात देऊन वचन दिलं होतं, तुमचा शिवसैनिक मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवेन, मात्र अजून माझं वचन पूर्ण झालेलं नाही’ असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एका वृत्तपत्राला मुलाखत देताना केले होते. याच वक्तव्याचा समाचार घेताना भाजप नेते निलेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली.
क्लिक करा आणि वाचा- राज्याचे गृहखात्येच सुरक्षित नाहीत तर सर्वसामान्याचं काय
निलेश राणे म्हणतात,”काय नाटक आहे…प्रॉपर्टीसाठी भाऊ कोर्टात आहे, कसलं कर्तव्य आणि कसलं काय. साहेबांनी सांगितलं होत काँग्रेसला कायमचा गाडून टाका उद्धव ठाकरेंनी खुर्चीसाठी स्व. बाळासाहेब ठाकरेंचे विचारचं गाडून टाकले.”
क्लिक करा आणि वाचा- रायगडावरुन संभाजीराजेंची आंदोलनाची हाक; १६ जूनला पहिला मोर्चा काढणार