
जळगांव (प्रतिनिधी) । शासननामा न्यूज ऑनलाईन
“मी शिवसेनेत राहू नये”, असं अनेकांना वाटतंय, अशी खंत व्यक्त करुन दाखवणारे पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून गंभीर आरोप करण्यात आला आहे. चिमणराव पाटील यांचा एक पाय सध्या शिवसेनेत व एक पाय भाजपमध्ये असल्याचा दावा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सतिश पाटील यांनी केला. तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे काम राष्ट्रवादीला आक्षेपार्ह वाटत नसताना त्यांच्याच पक्षाचे आमदार चिमणराव पाटील यांना ते का आक्षेपार्ह वाटते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
सतिश पाटील रविवारी जळगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार मनीष जैन, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, प्रदेश प्रवक्ता योगेश देसले, कार्याध्यक्ष विलास पाटील, जिल्हा बँक संचालक संजय पवार, महिला शहराध्यक्षा मंगला पाटील, प्रतिभा शिरसाठ आदी उपस्थित होते.
हेही वाचा : ‘१२ जणांचं निलंबन केलं पण आघाडी सरकारचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात’
यावेळी सतिश पाटील यांनी चिमणराव पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला. २०१४ च्या विधानसभेत आपला पराभव घडवून आणण्यात आला, असे चिमणराव पाटील म्हणतात. त्याचे खंडन करणे गरजेचे असून वृद्धापकाळामुळे चिमणरावांचे मानसिक संतुलनही अधिकच बिघडले आहे. राष्ट्रवादीत कार्यकर्ते मोठे करण्याची मानसिकता आहे. मात्र, शिवसेनेत वेगळे चित्र दिसतेय. जिल्हा परिषदेतील सदस्य डॉ. हर्षल माने यांची शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून निवड झाल्यानंतर तुमची झोप का उडाली?, असा सवाल सतिश पाटील यांनी चिमणराव पाटलांना विचारला.
हेही वाचा : फडणवीसांना सभागृहात बोलूच दिले नाही, भुजबळांना मात्र मुभा, यामुळे भाजप आमदार झाले आक्रमक
हेही वाचा : राज्यपाल भेटीत ठाकरे सरकारवर गंभीर आरोप; निलंबित आमदारांनी केल्या २ मागण्या
आमचे इतर लेख व बातम्या वाचण्यासाठी आणि विडिओ पाहण्यासाठी क्लिक करा फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम Dailyhunt Google News । Copyright © www.shasannama.in | All Rights Reserved.
[…] शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार? […]
[…] शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार? […]
[…] शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार? […]
[…] शिवसेनेचा …..हा आमदार भाजपात जाणार? […]