शासननामा न्यूज ऑनलाईन
अशावेळी प्रेग्नेंसीनंतर वाढलेलं वजन, पोट ही स्त्रियांसाठी मोठी समस्या बनते. वाढलेलं वजन म्हणजे अनेक आजारांना निमंत्रण. म्हणूनच स्त्रियांनी प्रेग्नेंसीनंतर देखील आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. पोट कमी करण्यासाठी व्यस्त वेळापत्रकामधून वेळ काढत नियमित व्यायाम केला पाहिजे. प्रेग्नेंसीनंतर कोणते व्यायाम करावेत, पोटाची चरबी कशी कमी करता येईल हे सविस्तर रूपात या लेखाच्या आधारे आपण जाणून घेणार आहोत.
प्लँक्स
प्रेग्नेंसीनंतर वजन कमी करण्यासाठी डाएटबरोबरच व्यायाम करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. विविध व्यायाम प्रकार आणि त्यामुळे वाढलेलं वजन कमी करण्यासाठी कशी मदत मिळते याची योग्य माहिती प्रत्येकाला असली पाहिजे. प्लँक्स हा व्यायाम प्रकार वाढलेलं पोट कमी करण्यासाठी मदत करतं. तसेच या व्यायामुळे पाठीचं दुखणं देखील कमी होतं. सर्वप्रथम पोटावर झोपा. त्यानंतर पायांची बोटं आणि हाताच्या कोपऱ्याच्या जोरावर संपूर्ण शरीर उचला. हाताचे कोपरे देखील खांद्याच्या बरोबरीने असुद्या. प्लँक्स हा व्यायाम प्रकार तुम्ही जीममध्येच नव्हे तर घरच्या घरी सुद्ध करू शकता.
(लग्नानंतर पतीची भलतीच मागणी; छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पुण्यातील घटना )
फ्लोअर सीट-अप्स
पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरणारा दुसरा व्यायाम प्रकार म्हणजे फ्लोअर सीट-अप्स. फ्लोअर सीट-अप्समुळे ओटी पोट कमी होण्यास मदत मिळते. फ्लोअर सीट-अप्स करण्याची योग्य पद्धत.
– सर्वप्रथम पाठीवर झोपा. त्यानंतर गुडघे वाकवा.
– दोन्ही हात मानेच्या पाठी ठेवा.
– त्यानंतर हळूहळू डोकं आणि शरीर वरती उचला.
लक्षात ठेवा कोणताही व्यायाम करत असताना योग्य पद्धतीनेच करा. दररोज कोणकोणते व्यायाम प्रकार करायचे हे तुम्ही ठरवत असाल तर फ्लोअर सीट-अप्सचाही त्यामध्ये समावेश असुद्या.
( ट्रान्सपरंट कपड्यांतील हॉट अभिनेत्रींनाही टाकलं मागे, लालभडक साडीतील नवरीबाईचा सर्वत्र धुरळा!)
वेगाने चालणे
नियमित व्यायाम केल्याने दिवसाची सुरुवात देखील अगदी चांगली होते. कोणतंही काम करताना उत्साह टिकून राहतो. तुम्ही दिवसातून २० ते २५ मिनिटे चालल्यास शरीराला याचा भरपूर लाभ मिळतो. प्रेग्नेंसीनंतर व्यायामामध्ये सातत्य ठेवणं महत्त्वाचंं आहे. वाढतं वजन कमी करण्यासाठी आठवड्यातून किमान पाच वेळा २० ते २५ मिनिटे वेगाने चाला. दोन आठवड्यानंतर चालण्याचा वेग वाढवा. यामुळे तुम्हाला तुमचे शरीर हलकं वाटू लागेल. तसेच लवकरात लवकर वजन कमी करण्यासाठी देखील मदत मिळू शकेल.
लेग रेज
लेग रेज या व्यायाम प्रकारामुळे पाय तसेच पोटाला भरपूर फायदा मिळतो. लेग रेजमुळे पाय तसेच पोटाचे स्नायू बळकट होण्यास मदत मिळू शकते. लेग रेज हा व्यायाम प्रकार करण्याची योग्य पद्धत.
– सर्वप्रथम पाठीवर झोपा.
– दोन्ही पाय एकत्र वरती करा.
– किमान तीन ते चार सेकंद याच स्थितीमध्ये राहा.
– त्यानंतर हळूहळू पाय खाली आणा.
दिवसातून दोन वेळा लेग रेजचे तुम्ही २० सेट्स करू शकता. या व्यायाम प्रकारामुळे शरीर मजबूत होण्यास मदत मिळते.
फ्लटर किक्स
नियमित विविध व्यायाम प्रकार केल्यामुळे तुम्हाला व्यायाम करणं कंटाळवाणं वाटत नाही. व्यायामाचे विविध प्रकार आणि त्यापासून शरीराला मिळणारे फायदे अनेक आहेत. यामधीलच एक व्यायाम प्रकार म्हणजे फ्लटर किक्स. फ्लटर किक्समुळे पोटाचे स्नायू बळकट होण्यास मदत मिळते. फ्लटर किक्स हा व्यायाम प्रकार करण्याची योग्य पद्धत.
– सर्वप्रथम पाठीवर झोपा.
– तुमचे दोन्ही हात जमिनीलगत सरळ ठेवा.
– त्यानंतर दोन्ही पाय ३० सेकंद खाली-वर करा.
ब्रिजिंग एक्सरसाइज
शरीरामधील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी ब्रिजिंग एक्सरसाइज (Bridging exercise) हा प्रकार उपयुक्त ठरतो. या व्यायाम प्रकारामुळे मांडी, पोटाचे स्नायू मजबूत होण्यास मदत मिळते. ब्रिजिंग एक्सरसाइज करण्याची योग्य पद्धत.
– सर्वप्रथम पाठीवर झोपा. त्यानंतर गुडघे वाकवा.
– हात तळहाताच्या दिशेने सरळ ठेवा.
– गुडघा, हिप्स आणि खांदा सरळ रेषेमध्ये येईपर्यंत जमिनीपासून शरीर वर उचला.
– किमान ५ सेकंद याच स्थितीमध्ये राहा.
– त्यानंतर हळूहळू मुळ स्थितीमध्ये या.
– काही सेकंद विश्रांती घेऊन पुन्हा याच पद्धतीने ब्रिजिंग एक्सरसाइज करा.
योगा
विविध व्यायाम प्रकार करत असताना योगाला देखील तितकंच प्राधान्य देणं गरजेचं आहे. एका आठवड्याचं व्यायाम प्रकाराचं शेड्यूल तुम्ही बनवत असाल तर त्यामध्ये योगाही असुद्या. नियमित योगा केल्यामुळे मन शांत होतं. तसेच शरीरामधील थकवा देखील नाहीसा होतो. तसेच तुम्ही कायम फिट राहता. डिलिव्हरीनंतर तुम्ही घर, कुटुंब, मुलांची जबाबदारी सांभाळत असताना थकत असाल तर योगा हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार तुम्ही विविध योगासने करू शकता.
डॉक्टरांचा सल्ला घ्या
वरील सांगितलेले सगळे व्यायाम प्रकार तुमचे वाढलेले वजन आणि पोट कमी करण्यास मदत करते. परंतू एक गोष्ट लक्षात असुद्या व्यायामाला सुरुवात करण्यापूर्वी डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्या. डिलिव्हरीनंतर बऱ्याच महिलांना शारिरीक दृष्ट्या विविध समस्यांचा सामना करावा लागतो. अशावेळी व्यायाम कधी करावा, कोणते व्यायाम प्रकार तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतात हे तुमच्या जवळच्या डॉक्टरांना विचारून घ्या. आणि नंतरच व्यायाम करण्यास सुरुवात करा.