Home देश-विदेश मराठी कुटुंब करतेय टॉलीवूड मध्ये अभिनय…. पाटलांचा हैद्राबाद मध्ये बोलबाला….

मराठी कुटुंब करतेय टॉलीवूड मध्ये अभिनय…. पाटलांचा हैद्राबाद मध्ये बोलबाला….

0
मराठी कुटुंब करतेय टॉलीवूड मध्ये अभिनय…. पाटलांचा हैद्राबाद मध्ये बोलबाला….

संपादक : सोमनाथ देवकाते | शासननामा न्यूज ऑनलाईन

श्री. नितिन सुकदेव पाटील आणि सौ. नंदिनी पाटील, आणि त्यांची मुले शौर्यवीर (रॉकी) आणि प्रिन्सेस इशानी हे पाटील कुटुंब मुळचे पंढरपूर चे असणारे आणि अनेक वर्षे पुण्यात राहत होते. नितिन जी हे IT कंपनीत नोकरी ला आहेत आणि त्यांची बदली मागील वर्षी हैद्राबाद झाली.

हैद्राबाद मध्ये आल्या पासुन त्यांनी आपल्या मराठी चा झेंडा रोवण्यास सुरवात केली. सुरवातीला भजन मंडळ ग्रुप चे कार्यक्रम घेऊन महाराष्ट्राची संत परंपरा हैद्राबाद मध्ये चालू ठेवली आणि आताही अखंड चालू आहे. त्यानंतर शिवजयंती ही साजरी झाली हैद्राबाद मध्ये आणि त्या मध्ये ही त्यांनी सहभाग घेतला.

नंतर त्यांना टॉलिवूड खुनवाय लागलं, आणि त्यांनी पहिल्यांदा छोटी पण प्रभावी अशी भूमिका “गीता सुब्रमनिअम 3” या चित्रपटात साकारली. विशेष म्हणजे पूर्ण फॅमिली ने पहिल्यांदा सोबतच कॅमेरा फेस केला. म्हणजे नितिन जी, नंदिनी ताई, शौर्यवीर आणि त्यांची गोड प्रिन्सेस इशानी यांनी सर्वांनी एकत्र काम केलं.

नंतर त्यांचा अभिनय आणि त्यांची आवड पाहुन आणि तेलुगू दिग्दर्शक शिवसाई वर्धन यांनी त्यांना आपल्या आगामी चित्रपटात काम करण्यासाठी विचारणा केली. नितिन जी आणि नंदिनी जी यांना ही भूमिका योग्य वाटली आणि त्यांचे काही सीन हे तेलगू आणि तमिळ मधील सुप्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता VT Ganesh यांचा बरोबर होते म्हणुन त्यांनी आपला होकार दिला. आताच पाटील कुटुंबानी पहिल्या दिवसाचं शूटिंग पूर्ण केलं….

नितिन जी, नंदिनी जी, रॉकी भाई, आणि प्रिन्सेस इशानी यांनी असेच महाराष्ट्र च नाव हैद्राबाद मध्ये रोशन करावं हीच शासननामा टीम करून शुभेच्छा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here