मेंढपाळ बांधवांना तात्काळ सात लाख मदत मंत्री गिरीश महाजन यांनी मिळवून दिली ; धनगर समाज नेते रामेश्वर पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

0
31

जळगांव (संपादक: सोमनाथ देवकाते) | शासननामा न्यूज ऑनलाईन

नांदगाव येथील मेंढपाळ भगवान कोळेकर व त्यांचे बंधू यांचे पहूर पासून जवळच असलेल्या पिंपळगाव येथे वादळी वाऱ्यामुळे नुकसान होऊन पाचशे मेंढ्या मृत्युमुखी पडल्या होत्या याची तात्काळ दखल घेऊन धनगर समाज संघर्ष समितीचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख रामेश्र्वर पाटिल यांनी पाठपुरावा करून नाशिक जिल्ह्यातील बानगाव ता नांदगाव येथील भगवान कोळेकर व त्यांचे बंधू यांना 7 लाख 66 हजार रुपयांचा धनादेश ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते धनादेश वितरीत केला घटनेच्या दहा दिवसांत तात्काळ शासकीय मदत धनगर समाज नेते रामेश्वर पाटील यांच्या प्रयत्नातून झाले. यामधे मा. खासदार डॉ विकास महात्मे यांनी मोलाचे सहकार्य केले.

मेंढपाळ बांधवांना तात्काळ सात लाख मदत मंत्री गिरीश महाजन यांनी मिळवून दिली ; धनगर समाज नेते रामेश्वर पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

यावेळी उपस्थित जामनेर येथे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन, धनगर समाजाचे नेते रामेश्वर भाऊ पाटील, राजधर भाऊ पांढरे, समाधान पाटील, विठ्ठल धनगर जे.के चव्हाण साहेब, जामनेर तहसीलदार नानासाहेब, निबोळकर साहेब, ना तहसीलदार जामनेर, गणेश मडलिक आदी उपस्थित होतें. मेढपाल धनगर बांधवांनी मंत्री गिरीश भाऊ यांचे आभार व्यक्त केले.