बिल्डींगचे बांधकामाच्या लोखंडी प्लेटा चोरी करणारे टोळीचा भारती विद्यापीठ पोलीसांकडुन पर्दाफाश; भारती विद्यापीठ पोलीसांची कामगिरी

0
31

पुणे (संपादक: सोमनाथ देवकाते) | शासननामा न्यूज ऑनलाईन

भारती विदयापीठ पोलीस स्टेशन हद्दीत चोरीचे गुन्हयांचे प्रमाण वाढल्यामुळे मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीहरी बहीरट यांनी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ व पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता यांना चोरीचे गुन्हयांतील आरोपीताचा शोध घेणेबाबत आदेशीत केले होते. त्यानुसार तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार हे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ८५४/२०२२ भादंवि कलम ३७९ या गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेण्यासाठी घटनास्थळावरील सी. सी. टी.जी. कॅमेरे व तांत्रिक विश्लेषण करीत असताना पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, आशिष गायकवाड यांना सदरचा गुन्हा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील विधीसंघर्षीत बालकाने त्याचे साथीदारांचे मदतीने केला असल्याची माहीती मिळाली. त्यांनी सदर विधीसंघर्षीत बालकास ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास करता त्याने त्या साथीदार दत्ता धनाजी पाटोळे २. साहील दत्ता ढावरे व आणखीन दोन विधीसंघर्षीत बालका असे सर्वांनी मिळुन दिनांक २० / १२ / २०२२ रोजी पहाटे ०३.०० या चे सुमारास जांभुळवाडी रोड, लिपाणे वस्ती, ब्ली कोस्ट बिल्डींगचे पाठीमागील मोकळया जागेमधुन बिल्डींगचे कामकाजाच्या प्लेटा चोरी केल्या असल्याची कबुली दिल्याने आरोपी

१. दत्ता धनाजी पाटोळे वय २० वर्षे, रा. तळजाई वसाहत, गल्ली नंबर ४४ पदमावती, पुणे

२. साहील ‘दत्ता ढावरे, वय १९ वर्षे, रा. तळजाई वसाहत म्हसोबा मंदीरजवळ, पदमावती, पुणे याना गुन्हयामध्ये अटक करून त्यांचेकडुन गुन्हयातील चोरी केलेल्या १,१०,०००/- रुपये (सध्याच्या वाजारभावानुसार ) किंमतीच्या एकुण १५० लोखंडी प्लेटा जप्त करण्यात आल्या आहेत.

सदरची कारवाई मा. श्रीमती स्मार्तना पाटील सो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ मा श्रीमती सुषमा चव्हाण सो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार मितेश चोरमले अभिनय चौधरी, अशिष गायकवाड, सचिन सरपाले, अवधुत जमदाडे, शैलेश साठे, चेतन गोरे, मंगेश पवार, निलेश ढमढेरे हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, राहुल तांबे यांच्या पथकाने केली आहे..