पुणे (संपादक: सोमनाथ देवकाते) | शासननामा न्यूज ऑनलाईन
दिनांक ०६/०५/२०१३ रोजी रात्री ०८.०० वा चे सुमारास कात्रज हायवे वरील आर्यन स्कुलजवळ मोबाईल नंबर
७७९६३४९७८३ धारक इसम व त्याचे पाच सहा मित्रांनी मिळून फिर्यादी यांचेकडुन ५० लाख रुपयाची खंडणी उकळण्याचे उद्देशाने फिर्यादी यांची कार आडगुन त्यांना गाडीतून खाली उतरुन त्यामधील एका इसमाने फिर्यादी गाना चाकुचा धाक दाखवून बाकीच्यांनी फिर्यादी यांना मारहाण करून शिवीगाळ केली व जाताना त्यातील एकाने “लक्षात ठेव” धमकी दिली.
तसेच दिनांक १२/०५/२०१३ रोजी दुपारी ०२.१५ वा मोबाईल नंबर ७३१९६३४९४८३ धारक इसमाने फिर्यादी यांना वॉटसअप कॉल करून त्यांना ५० लाख रुपयांची खंडणी मागुन, खंडणी नाही दिली तर फियोदी व त्यांचे कुटुंबास जीवीतास मारण्याची धमकी दिली आहे म्हणुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हयातील अज्ञात आरोपीताचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार हर्षल शिंदे, सचिन गाडे, धनाजी धोत्रे यांचे बातमीदाराचे मार्फतीने आरोपी निष्पन्न करून त्यामध्ये आरोपी १. सौरभ संजय बनसोडे, वय २१ वर्षे, रा. सर्व्हे नंबर ३५/०२. पिंगळे गिरणी चरती शिवाजी चौक, रामगनर, वारजे, पुणे २ पवन मधुकर कांबळे, वय २२ वर्षे, रा. कांबळे वस्ती, तरडे वस्ती, धायरी, पुणे ३. संकेत योगेश जाधव दय २४ वर्षे, रा. अत्महीत बिल्डींग, दुसरा मजला, अभिनव कॉलेजजवळ, आनंद सुपर मार्केट मागे, नन्हे पुणे ४. कृष्णा शिमराव माबट द १९ वर्षे रा. बेनकर वस्ती, दुर्गाकुर कॉम्पलेक्स, धायरी, पुणे यांना अटक केली आहे.
आरोपींनी असा रचला मालकाकडुन खंडणी मागण्याचा कट
आरोपी क्रमांक १ ते ३ हे फिर्यादी यांचे कंपनीत कामास असताना त्यांनी फिर्यादी यांचेकडे किती रक्कम आहे. फिर्यादी हे ऑफिसला कोणत्या गाडीत कधी येतात, कधी जातात, कोणत्या मार्गाने जातात याची माहीती घेतली. त्यानंतर आरोपी व त्यांचे साथीदारांनी मिळुन फिर्यादी यांना धमकावून खंडणी देण्यास प्रवृत्त व्हावे या करता त्यांनी कट रचुन दिनांक ०६/०५/२०२३ रोजी फिर्यादी यांचा कंपनीपासुन पाठलाग करून कात्रज हायवेवर त्यांची गाडी आठवुन फिर्यादी है। घाबरुन खंडणी देतील या उद्देशाने फिर्यादी यांना चाकुचा धाक दाखवुन धमकाविले होते. त्यानंतर आरोपीतांनी फिर्यादी दिनांक १२/०५/२०२३ रोजी यांना वॉटसअप कॉलद्वारे फोन करुन ५० लाख रुपयांची खंडणी मागितली आहे.
सदरची कारवाई मा. श्रीमती स्मार्तना पाटील सो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ मा नारायण शिरगावकर सो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार हर्षल शिंदे, सचिन गाडे, धनाजी धोत्रे, सचिन सरपाले, शैलेश साठे, चेतन गोरे, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, अवधुत जमदाडे, अभिनय चौधरी, निलेश खैरमोडे, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.