Home पिंपरी-चिंचवड GOLD MAN दत्ता फुगे खून प्रकरणातील आणखी दोन मारेकरी अटकेत, पोलिसांनी सापळा रचून पकडले

GOLD MAN दत्ता फुगे खून प्रकरणातील आणखी दोन मारेकरी अटकेत, पोलिसांनी सापळा रचून पकडले

0
GOLD MAN दत्ता फुगे खून प्रकरणातील आणखी दोन मारेकरी अटकेत, पोलिसांनी सापळा रचून पकडले

पिंपरी चिंचवड, 10 जून : सोन्याचा शर्ट (Gold Shirt) परिधान करत प्रसिद्ध झालेले पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) गोल्ड मॅन दत्ता फुगे (Gold Man Datta Fuge) यांच्या मारेकऱ्याला पोलिसांनी आठवडाभरापूर्वी अटक केली होती. त्यानंतर आता त्याच्या आणखी दोन साथीदारांनाही पिंपरी चिंचवड पोलिसांनी (Pimpri Chinchawad Police) अटक केली आहे. त्यांच्याकडूनही पोलिसांना काही शस्त्रसाठा मिळाला असून, पोलिसांच्या या कामगिरीचं कौतुक केलं जात आहे.

दत्ता फुगे यांची हत्या करणाऱ्या आरोपींपैकी एक असलेला प्रमोद उर्फ कक्का धौलपुरी याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली होती. भोसरी परिसरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न तो करत होता. त्यावेळी त्याबाबत पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्याच्यावर कारवाई करत पोलिसांनी त्याल अटक केली होती. त्यानंतर कक्का धौलपुरीया याच्या आणखी दोन साथीदारांनाही पोलिसांनी अटक केली आहे. प्रसन्ना पवार आणि अंकुश डांगले अशी या आरोपींची नाव आहेत. त्यांच्याकडूनही देशी पिस्टल आणि काडतुसं जप्त करण्यात आली आहेत.

दिघी परिसरात 15 जुलै 2016 रोजी भारतमाता नगर इथं गोल्ड मॅन दत्ता फुगे यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. त्यात कक्का धौरपुरीया याला प्रसन्ना पवार आणि अंकुश डांगले यांनीही मदत केली होती. त्यांनाही आता धौलपुरीया पाठोपाठ पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

कोण होते दत्ता फुगे

या कारवाईमुळं गोल्ड मॅन दत्ता फुगे हत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. भोसरी परिसरातील रहिवासी असलेले फुगे यांना सोनं परिधान करण्याची प्रचंड हौस होती. याच हौसे पोटी फुगे यांनी तब्बल 3 किलो सोन्याचा शर्ट तयार करून घेतला होता, ज्यामुळे फुगे यांची गोल्डमन म्हणून जगभर ओळख निर्माण झाली होती. मात्र याच खोट्या प्रतिष्ठेपायी फुगे यांचे अनके शत्रू तयार झाले. फुगे वक्रतुंड नावाने चिटफंडही चालवायचे. ज्यामध्ये त्यांनी अफरातफर केल्याचे आरोपही झाले होते आणि जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय असल्याने फुगे अनेक आर्थिक व्यवहार वादात सापडले आणि अशाच एका आर्थिक व्यवहारातूम 15 जुलै 2016 ला दिघी परिसरातील भारतमाता नगर येथे धौलपुरीयायाने आपल्या इतर साथीदारांसह गोल्डमॅन  फुगेचा दगडाने ठेचून खून केला होता.


Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here