Home देश-विदेश माजी पंतप्रधान एच.डी. देवगौडा आणि मी लवकरच हसन विमानतळाचा पायाभरणी करणार: कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा

माजी पंतप्रधान एच.डी. देवगौडा आणि मी लवकरच हसन विमानतळाचा पायाभरणी करणार: कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा

0
माजी पंतप्रधान एच.डी. देवगौडा आणि मी लवकरच हसन विमानतळाचा पायाभरणी करणार: कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा

बेंगळुरू – कर्नाटकात सत्ताधारी भाजपमधून आणि प्रबळ विरोधी पक्ष काँग्रेसकडून नेतृत्व बदलाचे आवाज उठत असतानाच मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी मात्र, वेगळीच चाल खेळायला सुरूवात केली आहे. त्यांनी विमानतळ डिप्लोमसी सुरू केली आहे. Former PM HD Deve Gowda and I will lay the foundation stone for the Hassan airport soon: Karnataka CM BS Yediyurappa

येडियुरप्पा यांनी जनता दलाचा स्ट्राँगहोल्ड असणाऱ्या हसन आणि शिवमोगा जिल्ह्यांचा दौरा केला आणि तेथील विकास कामांचा आढावा घेतला. कोरोनाच्या काळात देखील सरकारने सुरू केलेली विकास कामे थांबलेली नाहीत. तेथे निधी देखील वेळेवर उपलब्ध होतो आहे. ही विकास कामे लवकरात लवकर पूर्ण होतील, असे येडियुरप्पा यांनी पत्रकारांना सांगितले.

त्याचवेळी येडियुरप्पा यांनी राजकीयदृष्ट्या एक महत्त्वाची घोषणा केली. ते म्हणाले, हसन जिल्ह्यात विमानतळासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. लवरकरच त्याचे भूमिपूजन केले जाईल आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्यासह मी स्वतः त्या भूमिपूजनात सहभागी होईन.

हसन हा देवेगौडांचा पारंपरिक लोकसभा मतदारसंघ आहे. तेथे विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी देवेगौडा आग्रही होते. त्याचेच भूमिपूजन येडियुरप्पा हे देवेगौडांना बरोबर घेऊन करणार आहेत. राज्यात येडियुरप्पा यांच्या विरोधात सत्ताधारी भाजपमधून तसेच प्रबळ विरोधी पक्ष काँग्रेसकडून आवाज उठत असताना येडियुरप्पा हे देवेगौडांची पर्यायाने धर्मनिरपेक्ष जनता दलाची राजकीय सहानुभूती आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

देवेगौडा आणि त्यांचे पुत्र माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी हे काँग्रेसपासून दूर गेलेच आहेत. विमानतळाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांची साथ आपल्याला मिळाली तर आपल्या मुख्यमंत्रीपदाला भाजपमधले विरोधक धोका निर्माण करू शकत नाहीत, असा येडियुरप्पा यांचा राजकीय होरा असावा, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Former PM HD Deve Gowda and I will lay the foundation stone for the Hassan airport soon: Karnataka CM BS Yediyurappa

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here