Home देश-विदेश भाजपने बेळगाव महानगरपालिकेत बसवला मराठी महापौर; फडणवीस-शिंदेंची केली यशस्वी

भाजपने बेळगाव महानगरपालिकेत बसवला मराठी महापौर; फडणवीस-शिंदेंची केली यशस्वी

0
भाजपने बेळगाव महानगरपालिकेत बसवला मराठी महापौर; फडणवीस-शिंदेंची केली यशस्वी

बेळगाव (विशेष प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन

बेळगाव महापालिकेच्या (belgaum mahanagar palika) महापौर, उपमहापौर पदाची निवड सोमवारी झाली. महापौरपदी मराठी नगरसेवक शोभा सोमना तर उपमहापौरपदी समितीच्या रेश्मा पाटील यांची निवड झाली.

बेळगाव महानगर पालिकेत सर्वाधिक जागा भाजपच्या होत्या. भारतीय जनता पक्षाकडे अनेक कन्नड संघटनांनी कन्नड उमेदवार महापौरपदी द्यावा, अशी मागणी केली होती. परंतु भाजपने मराठी उमेदवारालाच दोन्ही पदे देत कन्नड संघटनांना धक्का दिला. या निवडीनंतर बेळगावमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला. कर्नाटक भाजपने केलेल्या या खेळीचा परिणाम महाराष्ट्रात होणार आहे.

भाजप कोअर कमिटीच्या घोषणेनंतर महापौरपदी भाजपच्या शोभा सोमना तर उपमहापौरपदी समितीच्या रेश्मा पाटील यांची निवड केली. सोमवारी निवडणूक असल्यामुळे पालिकेत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांनी भगवा फेटा बांधला होता. बेळगाव निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणा यावेळी दिल्या.

ही नावे होती चर्चेत

महापौर पदासाठी सारिका पाटील, शोभा सोमना आणि वाणी जोशी यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. तर उपमहापौर पदासाठी वैशाली भातकांडे यांनी अर्ज भरला होता. महापौरपदी शोभा सोमानेचे तर उपमहापौर पदासाठी रेश्मा पाटील यांचे नाव निश्चित झाले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here