Home महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र Pune Crime News | पुण्यात कामगाराला मारहाण करुन खून; कंपनी मालकासह, माजी पोलिसाचा आरोपींमध्ये समावेश, 13 जणांवर गुन्हा दाखल

Pune Crime News | पुण्यात कामगाराला मारहाण करुन खून; कंपनी मालकासह, माजी पोलिसाचा आरोपींमध्ये समावेश, 13 जणांवर गुन्हा दाखल

0
Pune Crime News | पुण्यात कामगाराला मारहाण करुन खून; कंपनी मालकासह, माजी पोलिसाचा आरोपींमध्ये समावेश, 13 जणांवर गुन्हा दाखल

पुणे (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन

कोविळ काळापासून थकीत पगाराच्या वादातून कंपनी मालकासह इतरांनी कामागरास बेदम मारहाण (Beating) करुन खून (Pune Murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कंपनी मालकांसह काही गुंडांवर विरोधात आणि एका माजी पोलिसाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 1 सप्टेंबर 2022 रोजी शिवाजीनगर येथील मॉडेल कॉलनीत घडला आहे. अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करुन चतु:श्रृंगी पोलिसांनी (Pune Police) तपास करुन हा खून असल्याचे उघडकीस आणले आहे.

अविनाश भिडे (वय-36) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी कंपनी मालक शेखर महादेव जोगळेकर Company Owner Shekhar Mahadev Joglekar (वय-58 रा. सुदर्शन सोसायटी, मॉडेल कॉलनी), प्रणव शेखर जोगळेकर (वय-22), माजी पोलीस आणि एका राजकिय पक्षाचा प्रमुख पदाधिकारी दयानंद सिद्राम इरकल (रा. पांडवनगर), बाळू पांडुरंग मिसाळ (वय-53 रा. काकडे पॅलेसमागे, कर्वेनगर), प्रमोद श्रीरंग शिंदे (वय-29, रा. शिवणे), रुपेश रवींद्र कदम, संतोष उर्फ बंटी दत्तात्रय हरपुडे, प्रकाश नाडकर्णी, नकुल शेंडकर यांच्यासह इतर 4 जणांविरोधात आयपीसी 302, 141, 143, 147, 149 नुसार गुन्हे दाखल केला आहे.

याबाबत मयत अविनाश यांच्या पत्नी रेश्मा अविनाश भिडे (वय-30 रा. बेनकर वस्ती, धायरी) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) गुरुवारी (दि.2) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती अविनाश भिडे हे शेखर जोगळेकर यांच्या कंपनीत मशीन ऑपरेटर म्हणून काम करत होते. या दोघांमध्ये पगारावरुन वाद होत होते. यापूर्वीही शेखर जोगळेकर आणि प्रणव जोगळेकर यांनी अविनाश यांना शिवीगाळ करुन माराहण करुन ऑफिस मधून हाकलून दिले होते. घटनेच्या दिवशी देखील त्यांनी आपसात संगनमत करुन अविनाश यांना बेदम मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी होऊन अविनाश यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी तपास केला असता अविनाश यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले.

शासननामा न्यूजच्या प्रतिनिधींनी रेश्मा भिडे यांच्याशी संपर्क केले असता ते बोलले की, त्यांच्या पतीचे 1 सप्टेंबर 2022 रोजी निधन झाल्यानंतर त्यांची पोलिसांत तक्रार केल्यास तुम्हाला व दोन्ही मुलांच्या जीवाला धोका होईल असे रोज वेगवेगळ्या लोकांना कडून फोन व प्रत्यक्ष घरी येऊन धमकवात होते त्यामुळे त्यांनी Human Rights Commission कडे धाव घेतली होती. पोलिसांनी माझ्या पतीच्या खुनींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी त्यांनी राज्याचे गृहमंत्री यांना पत्रकाद्वारे केली.

पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे जगन्नाथ जानकर (PI Jagannath Jankar) करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here