Home पिंपरी-चिंचवड Pramod Pardeshi : प्रमोद परदेशी यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेश भटके विमुक्त आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस पदी निवड

Pramod Pardeshi : प्रमोद परदेशी यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेश भटके विमुक्त आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस पदी निवड

0
Pramod Pardeshi : प्रमोद परदेशी यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेश भटके विमुक्त आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस पदी निवड

पुणे (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन

राजकीय पक्षाच्या माध्यमातून उपेक्षित घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी किंवा शासनदरबारी प्रश्न मांडण्याचा  प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांची आज खरी गरज आहे आणि असा युवा कार्यकर्ता प्रमोद परदेशी यांची भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस पदी निवड करण्यात आली.

महाविद्यालयीन काळापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पासून तर 2010 पासून गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून नमो ग्रुप फाउंडेशनचे युवा प्रदेश अध्यक्ष तर भाजपा पक्ष यंत्रणेत गेल्या 9 वर्षांपासून प्रदेश स्तरात काम करीत आहेत त्याच बरोबर भारत दूरसंचार निगम लि. पुणे विभागात भारत सरकारच्या वतीने सल्लागार पदी निवड झाली.

धनगर समाज, भटके-विमुक्त, ओबीसी समाजाचे  प्रश्न सोडवणुकीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न प्रमोद परदेशी करत असतात त्याच बरोबर नमो ग्रुप फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यभर उत्साही  तरुणांचे संघटन उत्कृष्ट पद्धतीने करत आहेत.

धनगर समाजचे हिताचे विविध उपक्रम राबविणे असोत कि मग  बारामती येथील जुलै २०१४ च्या धनगर आरक्षणासमितीत सक्रिय सहभाग असतोत, धनगर समाज आरक्षण कृती समितीचे दिल्ली जन्तरमंतर येथे बेमुदत उपोषणास भेट देऊन जन क्रांती संघाच्या माध्यमातून प्रधानमंत्री कार्यालयास २५ जुलै २०१६ निवेदन दिले. ओबीसी समाजात हि  तितकेच स्वतःची पकड निर्माण करीत सर्व पक्षीय ओबोसी समाजाच्या कार्यात मोलाचे कार्य करीत आहेत.

प्रमोद परदेशी यांची निवड भटके-विमुक्त आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यांना अनेक वर्षापासुन समाजसेवेचा प्रदिर्घ अनुभव आहे. पक्षाने दिलेल्या जबाबदारीला शंभर टक्के न्याय देऊन समाजातील सर्व ओबोसी व भटके-विमुक्तांच्या प्रश्नांना वाचा फोडीन व पक्षाच्या माध्यमातुन न्याय माळवुन देण्यासाठी सदैव प्रयन्तशील राहणार असल्याचे प्रमोद परदेशी यांनी सांगीतले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश अध्यक्ष, लातूर जिल्हा परिषदेचे मा अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी महाराष्ट्र प्रदेशाची 76 पदाधिकार्यांची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली.


या निवडीचे  ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, भाजपा प्रदेश महामंत्री विजय भाऊ चौधरी, माजी मंत्री आमदार राम शिंदे, भोसरीचे आमदार महेश दादा लांडगे, प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, मा खासदार डॉ विकास महात्मे, मा आमदार नरेंद्र पवार, जळगांवचे खासदर उन्मेष पाटील, चाळीसगाव चे आमदार मंगेश चव्हाण, आमदार गोपीचंद पडळकर, पुणे शहर भाजपा अध्यक्ष धिरज घाटे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शंकर जगताप यांनी प्रमोद परदेशी यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here