मासे, दुग्धजन्य पदार्थ तसेच इतर खाद्यपदार्थांमधून आयोडिनचा शरीराला पुरवठा होतो. आयोडिनचं योग्य प्रमाणात सेवन केलं की शरीर निरोगी राहते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, आयोडिनचं कमी प्रमाणात सेवन केल्यास बाळाला विविध आजारांचा सामना करावा लागतो. गर्भामध्ये वाढणाऱ्या मुलाच्या विकासासाठी आयोडिनचे योग्य प्रमाणात सेवन स्त्रियांनी करणं खूप गरजेचं आहे. आयोडिनचं किती प्रमाणात सेवन केलं पाहिजे, आयोडिनचं महत्त्व काय याची माहिती गर्भवती स्त्रियांना असणं महत्त्वाचं आहे. या लेखाच्या आधारे आम्ही तुम्हाला आयोडिनचे महत्त्व आणि त्यामुळे शरीराला होणारे फायदे सांगणार आहोत.
प्रेग्नेंसीमध्ये आयोडिन महत्त्वाचं
गरोदरपणात स्त्रियांनी शरीराला पोषक घटकांचा पुरवठा होईल अशा पदार्थांचे सेवन करणं गरजेचं आहे. आयोडिनही एक महत्त्वपूर्ण पोषक घटक आहे. निरोगी शरीराचं रहस्य म्हणजे आयोडिनचे पुरेशा प्रमाणात सेवन. आयोडिनमुळे शरीरामधील प्रत्येक प्रक्रिया सुरळीतपणे होते. तसेच वेगवेगळ्या अवयवांना देखील याचा फायदा होतो. आयोडिनमुळे थायरॉइड हार्मोनस तयार होण्यास सुरुवात होते. त्याचबरोबरीने पेशींच्या कार्यप्रणालीवरही याचा चांगला परिणाम दिसून येतो. मात्र प्रेग्नेंसीमध्ये आयोडिनचे कमी प्रमाणात सेवन केले की शरीरामधील थायरॉइड हार्मोनसचे प्रमाण देखील कमी होण्यास सुरुवात होते. परिणामी वजन वाढणे, थकवा जाणवणे आणि सतत मूड बदलणे या समस्या उद्भवतात.
(मलायकाची पार्टी पण हॉट लुकमुळे गौरी खान व करीना कपूर जोमात, बाकी सगळे कोमात)
गर्भाशयात बाळावर होणारे परिणाम
स्त्रियांनी गरोदरपणात चांगल्या खाद्यपदार्थांचे सेवन केले पाहिजे, बाळाच्या विकासासाठी योग्य ती काळजी घेतली पाहिजे अशा अनेक गोष्टी घरातील वरिष्ठ मंडळींच्या तोंडून गरोदरपणात तुम्ही ऐकल्या असतील. या गोष्टींमध्ये तथ्य देखील तितकंच आहे. पोषक घटकांचा समावेश असलेल्या पदार्थांचे सेवन तुमच्या बाळाच्या वाढीसाठी उपयुक्त ठरते. आयोडिनमुळे तर गर्भाशयातील बाळाचा विकास जलद गतीने होतो. आयोडिनमुळे गर्भाशयातील बाळामध्ये होणारे बदल.
– मेंदूचा विकास
– जटिल अवयवांची वाढ
– बौद्धिकदृष्ट्या विकास
मात्र पुरेशा प्रमाणामध्ये आयोडिनचं सेवन स्त्रियांनी केलं नाही तर बाळाला विविध आजारांचा सामना देखील करावा लागतो.
(डिलिव्हरीनंतर ‘या’ २ ट्रिक्स वापरुन तब्बल २० किलो वजन केले कमी, मिळवली स्लिम-ट्रिम फिगर!)
किती प्रमाणात आयोडिनचं सेवन करावं?
बऱ्याच खाद्यपदार्थांमध्ये आयोडिनचा समावेश असतो. आयोडिनयुक्त खाद्यपदार्थांचे सेवन करणं अगदी गरजेचं आहे. बहुतांश गर्भवती स्त्रिया आयोडिनयुक्त खाद्यपदार्थांचे सेवन करत नाहीत हे काही संशोधनामधून समोर आलं आहे. मात्र स्त्रियांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष करणं बाळासाठी जीवघेणं ठरू शकतं. स्त्रियांमध्ये आयोडिन किती प्रमाणात असलं पाहिजे?
– कंसीव करत असताना १५० मायक्रोग्राम
– प्रेग्नेंसीदरम्यान २२० मायक्रोग्राम
– स्तनपान करताना २९० मायक्रोग्राम
योग्य प्रमाणात शरीरामध्ये आयोडिन असेल तर यामुळे बाळाबरोबरच आईचा देखील शारिरीकदृष्ट्या विकास होण्यास मदत मिळू शकते.
(नेहा कक्कर ‘या’ गंभीर समस्येमुळे दिसू लागली होती विचित्र! कसं मिळवलं पुर्ववत सौंदर्य?)
आयोडिनचं अधिक प्रमाणात सेवन करू नका
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थच्या म्हणण्यानुसार, गर्भवती महिलांनी ११०० मायक्रोग्रामपेक्षा अधिक आयोडिनचं सेवन करणं टाळलं पाहिजे. यामुळे बाळाला तसेच गर्भवती महिलेला गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. आयोडिनचे अधिक प्रमाणात सेवन केल्यास हायपोथायरॉडीझसारखी समस्या उद्भवू शकते. यामूळे अनेक आजार देखील उद्भवू शकतात. शरीरामध्ये आयोडिनचे प्रमाण अधिक वाढू नये म्हणून डॉक्टर देखील आयोडिन सप्लिमेंट घेण्याचा सल्ला गर्भवती महिलांना देत नाहीत. त्यामुळे पुरेशा प्रमाणातच गर्भवती महिलांनी आयोडिनयुक्त पदार्थांचं सेवन केलं पाहिजे.
या पदार्थांचे करा सेवन
आयोडिनयुक्त खाद्यपदार्थांचे सेवन करणं बाळाच्या विकासासाठी कितपत फायदेशीर ठरतं याची माहिती गर्भवती महिलांना असली पाहिजे. आपल्या नेहमीच्या आहारामध्ये आयोडिनयुक्त पदार्थांचा समावेश असणं देखील गरजेचं आहे. पांढरे मासे, दुग्धजन्य पदार्थांमध्ये आयोडिनचा समावेश असतो. या पदार्थांचे पुरेशा प्रमाणात सेवन केले तर तुमच्या शरीरामध्ये आयोडिनचे प्रमाण वाढू शकते. त्याचबरोबरीने आहारामध्ये साधारण मीठाचा वापर न करता आयोडिनयुक्त मीठाचा वापर करा. शरीरामध्ये आयोडिनचं प्रमाण वाढवण्यासाठी मीठाचे अधिक सेवन करणं गरजेचं नाही.
(‘हे’ पदार्थ खात असाल तर वेळीच व्हा सावध! होऊ शकतो हा भयंकर आजार)
तज्ज्ञांचं मत काय?
अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिशनच्या म्हणण्यानुसार, गर्भवती तसेच स्तनपान करणाऱ्या महिलांनी नायट्रेटचं सेवन करणं टाळलं पाहिजे. यामुळे शरीररामधील आयोडिनची क्षमता कमी होतो. लो फॅट दही, मासे, अंड, कॉर्न, सफरचंदाचा रस यामध्ये देखील आयोडिनचा समावेश असतो. याव्यतिरिक्त फळं, भाज्या, भात, ओट्स, अंड्याचा सफेद भाग, मध, मसाले, शेंगदाणे, औषधी वनस्पती यामध्ये आयोडिनचं प्रमाण फार कमी असतं. त्यामुळे योग्य त्या खाद्यपदार्थांचे सेवन करणं गर्भवती महिलांच्या शरीरासाठी आणि बाळाच्या विकासासाठी उपयुक्त ठरू शकतं.
(मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केलाच नव्हताः महापौर किशोरी पेडणेकर)